‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचे सादरीकरण करून महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याच्या घोषणेचे रविवारी स्वागत करण्यात आले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्यावतीने नागरिकांना साखर वाटून आनंद द्विगुणित करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- निवृत्त सरकारी अधिकारी महेश झगडे यांचा कस्तुरबा रुग्णालयाला मदतीचा हात

‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत ऐकताच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला एक वेगळेच स्फुरण चढते. महाराष्ट्राची महती सांगणाऱ्या या गीताला महाराष्ट्र शासनाने राज्यगीताचा दर्जा देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शाहिरांच्यावतीने शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंत मावळे यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे सादरीकरण केले. फर्ग्युसन रस्त्यावरील नामदार गोखले चौक येथील कलाकार कट्टा येथे झालेल्या कार्यक्रमात प्रबोधिनीचे सचिव अरुणकुमार बाभुळगावकर, प्रा. संगीता मावळे, होनराज मावळे आणि सक्षम जाधव यांनी सहभाग घेतला होता. मावळे म्हणाले, शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्व शाहिरांना अभिमान वाटत आहे.