पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरीता आज भाजपकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांच्या रूपाने ब्राह्मण समजाला नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळेल असे वाटत होते. मात्र ती संधी मिळाली नाही. त्यामुळे शहरात ब्राह्मण समाजाचं नेतृत्व करणारा चेहरा दिसत नाही. त्यावर शैलेश टिळक म्हणाले ” पुणे शहरात सध्या एकही ब्राह्मण उमेदवार नसल्याने ब्राह्मण समाजात ती अन्यायाची भावना आहे. ती देखील लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे”.