लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष्य केंद्रित केले असताना शरद पवार समर्थक गटाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. शहराध्यक्ष आणि युवक शहराध्यक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने युवक शहराध्यक्षांच्या पुढाकाराने काळेवाडीत उभारलेले पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटनापूर्वीच बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शहरातील पक्ष संघटना, आमदार, बहुतांशी माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. पवार यांना मानणाऱ्या आणि नवीन कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून काळेवाडीत प्रशस्त असे पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उभारले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शरद पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले. पण, भाजपमधून आलेले तुषार कामठे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविल्यानंतर पक्षात धुसफूस सुरू झाली.

आणखी वाचा-जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर अजित पवार गटाचे वर्चस्व; बारामती तालुक्यातील दोन ग्रामपंचायती भाजपकडे

काळेवाडीतील कार्यालय शहराध्यक्ष कामठे यांना पसंत पडले नाही. कार्यालयाचे प्रकरण थेट प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात पोहोचले होते. पिंपरी परिसरात जनसंपर्क कार्यालय असावे अशी भूमिका शहराध्यक्ष कामठे यांनी घेतली. त्यामुळे वर्गणी काढून थाटलेल्या कार्यालयाचे भाडे भरणे परवडत नसल्याने उद्घाटनापूर्वीच बंद करण्याची नामुष्की जुन्या कार्यकर्त्यांवर ओढवली.

कामठे यांनी पिंपरी परिसरात कार्यालयाचे काम सुरू केले असून महिनाअखेरीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यालयासह विविध कारणांवरून पक्षात गटबाजी सुरू झाली आहे. मोठ्या नेत्यांना पिंपरी मतदारसंघातच नेले जाते. शहराध्यक्षांचा पिंपरीवरच भर दिसून येतो, असा नाराजीचा सूर पक्षातून येत आहे. ताकद कमी झाली असताना पक्षातील गटबाजीने सुरुवातीलाच डोकेवर काढले. शहराची जबाबदारी असलेले आमदार रोहित पवार हे गटबाजीवर कसा तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा-पुणे : वाघोलीत विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कार्यकर्त्यांना, नागरिकांना सोयीस्कर होईल, यासाठी पक्ष कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. त्यानुसार काळेवाडीतील कार्यालय बंद करून पिंपरीत काम सुरू केले आहे. -तुषार कामठे, शहराध्यक्ष

पक्ष कार्यालय चिंचवडमध्ये नको तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात असावे, असा काहींचा आग्रह होता. त्यामुळे काळेवाडीतील कार्यालय बंद केले. आम्ही तीन महिने कार्यालयाचे भाडे भरले. -इम्रान शेख, युवक शहराध्यक्ष