पिंपरी- चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या शहराध्यक्ष पदाच्या निवडीला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण होऊ शकते असं म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. अमोल थोरात यांना भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं असून, घर म्हटलं की नाराजी येते, जर कोणी नाराज असेल तर लहान भाऊ, मित्र म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याशी चर्चा करून सर्वसमावेश काम करू असं म्हटलं आहे.

पिंपरी- चिंचवड शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची वर्णी लागली आहे. शंकर जगताप हे माजी नगरसेवक आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार तथा मावळते शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपल्याने शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्त केलं आहे. परंतु, या निवडीवरून आता पिंपरी-चिंचवड भाजपच्या स्थानिक राजकारणात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त करत एकाच परिवारात दोन पदे का? असा प्रश्न विचारला आहे. जगताप कुटुंबाला झुकते माप का? यातून परिवार वाद दिसून येतो असं म्हणत त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

BJP target for Bihar Chief Minister post after victory in Delhi assembly elections
दिल्लीच्या विजयानंतर भाजपचे पुढील लक्ष्य बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
malang gad festival
मलंग गडाच्या उत्सवासाठी दोन्ही शिवसेनेची मोर्चेबांधणी; दोन्ही गटांकडून भाविकांना आवाहन, दोघांकडून तयारी
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ

आणखी वाचा-विधान परिषदेच्या माध्यमातून पुण्यात शिवसेना शिंदे गटाला बळ? ‘या’ नावांची चर्चा

शहराध्यक्ष पदाच्या निवडीला पक्षांतर्गत विरोध असल्याचा प्रश्न शहराध्यक्ष शंकर जगताप यांना विचारला असता ते म्हणाले, अजूनपर्यंत तर तसं माझ्या कानावर काय आलेलं नाही. घर म्हटलं की थोडी नाराजी असते. जरी कुणाची नाराजी असेल तर मी लहान भाऊ म्हणून मित्र म्हणून सर्वजण त्यांच्याशी चर्चा करू आणि सगळ्यांना घेऊन सर्वसामावेशक काम करू.

Story img Loader