पुणे : गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपार दीड वाजण्याच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आठ आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. या घटनेची पुणे शहरात एकच चर्चा सुरू असताना. काल दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास डीपी रोडवरील पुणे शहर भाजपच्या नव्या कार्यालयास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भेट घेऊन दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेबाबत तुम्हाला भेटून सविस्तर सांगायचे असल्याची मागणी केली होती. त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल असे आश्वासन स्वाती मोहोळ यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्व घडामोडी दरम्यान आज भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी सुतारदारा येथील शरद मोहोळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्वाती मोहोळ यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली.

आणखी वाचा-भाजपा आमदार नितेश राणे यांनी घेतली गुंड शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; म्हणाले, “त्यांनी हिंदुत्वासाठी…”

त्यावेळी स्वाती मोहोळ म्हणल्या की, माझ्या राज्य सरकार आणि प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे. माझी पती हिंदुत्ववादाच काम करतात. त्यामुळे ही घटना घडली आहे. समोरच्याला जर वाटत असेल की, असे करून मी खचून जाईल. त्यामुळे मी त्यांना एकच सांगू इच्छिते की, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे. तसेच मला जोपर्यंत मरण येत नाही. तो पर्यंत हिंदुत्ववादासाठी लढत राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.