आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा वाढदिवस सोमवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरभर जोरदार फलकबाजी करत राष्ट्रवादीने चांगलीच वातावरणनिर्मिती केली. ‘साहेब’ या जाहिरात फलक मालिकेतून पालिकेची विकासकामे ठळकपणे मांडण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आगामी निवडणुका तोंडावर असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत शरद पवार यांचा वाढदिवस उद्योगनगरीत यंदा जास्त उत्साहात साजरा करण्यात आला.

पवारांना शुभेच्छा देतानाच राष्ट्रवादीने सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांवर ठळकपणे प्रकाशझोत टाकण्यात आला. विकासाचा मुद्दा घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. त्यासाठी िपपरी-चिंचवडला ‘विकासनगरी’ ठरवून त्याचे ‘मार्केटिंग’ करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवशी विकासनगरीची जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली. तेव्हा सकारात्मक प्रतिक्रिया आल्यामुळे १२ डिसेंबरला पुन्हा त्याच पध्दतीने शहरभरात जाहिरातबाजी करण्यात आली.