पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एका व्यासपीठावर असतील अशी अपेक्षा नाट्यरसिकांना होती. मात्र, काका आणि पुतण्या हे दोघेही शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या पुण्यातील शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. आता पिंपरी-चिंचवड येथील संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात तरी काका-पुतण्या एकत्र असतील का याचे उत्तर मिळण्यासाठी नाट्यरसिकांना शनिवारची (६ जानेवारी) प्रतीक्षा करावी लागेल.

शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या पुण्यातील शुभारंभाच्या कार्यक्रमास केवळ उद्योगमंत्री उदय सामंत व्यासपीठावर उपस्थित होते. नाट्य परिषदेच्या संयोजन समिती अध्यक्ष नात्याने सामंत उपस्थित होते.

हेही वाचा : पारंपरिक पेहरावातील दुचाकी फेरीने शंभराव्या नाट्य संमेलनाची नांदी

नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी, नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, माजी संमेलनाध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, खासदार श्रीनिवास पाटील, नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, शशी प्रभू, अशोक हांडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले या वेळी व्यासपीठावर होते. ज्येष्ठ अभिनेते स्वरूपकुमार, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी आणि सुहासिनी देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader