राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार कुटुंबातील सर्व लोक उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओ पाहा :

व्हिडीओत शरद पवार, अजित पवार उद्घाटन कार्यक्रमातील फोटोसाठी उभे असलेले दिसत आहेत. यावेळी अजित पवार सुप्रिया सुळेंना हात करून फोटोत सहभागी होण्यासाठी बोलवतात. त्यानंतर सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या शेजारी येऊन उभे राहतात. फोटो काढताना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाविषयी माहिती देत अजित पवार यांनीही आपल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं, “विद्या प्रतिष्ठानचे ‘अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल’, या नूतन वास्तूचा उद्घाटन व नामकरण समारंभ.”