पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना शरद पवार आणि अजित पवार हे कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी (१६ जानेवारी) बारामतीमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांंच्या खून प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी सातत्याने केली आहे. अजित पवार हे मुंडे यांची पाठराखण करत असल्याने अजित पवार यांच्यावरही टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार बारामतीमध्ये कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाच्या निमित्ताने राजकीय टीका-टिप्पणी होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीयातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. पक्ष फुटीनंतर पवार कुटुंबीयातही फूट पडली होती. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांची पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी दिली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवार यांनी बारामतीमधून एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळविला. अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणूक प्रचारातही पवार कुटुंबीयांकडून भावनिक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे यश मिळाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच ‘ताटात पडलं काय किंवा वाटीत पडलं काय’ असे वक्तव्य करून अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबतचा संभ्रम कायम ठेवला आहे.