Sharad Pawar and Devendra Fadnavis माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी आले. एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे.
हेही वाचा >>> “अजितदादा, तुम्ही चार दिवस कुठे लपून बसले होतात”; चंद्रकांत पाटील यांचा सवाल
कार्यक्रमाच्या ठिकाणी पवार आणि फडणवीस हे एकाच गाडीतून आले. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू उपस्थित राहणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना ‘डॉ.पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. सध्या राज्यात विविध विषयांवर वाद निर्माण झाले असताना, पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.