पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी शनिवारी भोरमध्ये घोषित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
शरद पवार म्हणाले, की सुप्रिया सुळेंची उमेदवार म्हणून घोषणा करतो. देशात पहिले दोन किंवा तीन खासदार जे काम करणारे आहेत, ज्यांची संसदेमध्ये जास्तीत जास्त उपस्थिती आहे आणि सात वेळेला ज्यांना संसदरत्न मिळाला, असा उमेदवार तुमच्यासमोर आहे. त्यांना निवडून आणण्याची जाबाबदारी तुमची आहे.
हेही वाचा >>>पुणे: राजकारणात नटसम्राट सारखे काहीजण वागत आहेत..पण, देवेंद्र फडणीवसांची फटकेबाजी
आमदार संग्राम थोपटे यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, तुम्ही जे काही कराल तुमच्या पाठिशी शरद पवार कायम असेल. एकदा मी पाठिशी असलो की परिवर्तन झाल्याशिवाय रहात नाही.