‘तुम्ही ज्या शाळेत शिकता ना, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे’, हा एखाद्या चित्रपटातील दमदार संवाद वाटू शकतो, मात्र निवडणुकीच्या धामधुमीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात ‘बनवाबनवी’ करणाऱ्या ‘खोडकर’ कार्यकर्त्यांना उद्देशून तो वापरला आहे. नेत्यांनाच टोपी घालणारेअनेक कार्यकर्ते आहेत. ते फक्त राष्ट्रवादीत आहेत असे नाही. जवळपास सर्वच पक्षांत त्यांचा मुक्त संचार आहे. अशा ‘बनवाबनवी’चा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे आणि यापुढेही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वेळीच त्यांना ‘डोस’ देण्याचे काम अजित पवारांनी केले आहे. पक्षनिष्ठा खुंटीला टांगून व्यक्तिपूजेचे महत्त्व जोपासत प्रत्येकाने आपापल्या नेत्याच्या मागे जाण्याची भूमिका घेतल्याने पिंपरीतील बलाढय़ राष्ट्रवादीला आजचे दिवस पाहावे लागत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
[jwplayer uy9ZaylQ]
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ‘कार्यशाळा’ झाली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. या कार्यशाळेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हेडमास्तरांच्या भूमिकेत येऊन ‘माझ्याशी बनवाबनवी करू नका’ अशी तंबीच ‘खोडकर’ इच्छुक उमेदवारांना उद्देशून दिली. आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने अद्याप कोणाचेही तिकीट ‘फिक्स’ केले नाही. योग्य वेळी उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे स्पष्ट करताना त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या खोडकरपणाचे सूचक व प्रातिनिधिक उदाहरण दिले. पक्षाकडे इच्छुक असणारे रिंगणात काँग्रेसचा, भाजपचा, शिवसेनेचा संभाव्य उमेदवार कोण आहे, याचा अभ्यास करतात. भाजप-शिवसेनेची युती झाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल. ओबीसी गटात उभा राहू की खुल्या गटात उभा राहू, याची चाचपणी करतात. ठराविक उमेदवार खुल्या गटात असल्यास आणि त्याच्या समोर लढायचे नसल्यास दुसऱ्या गटाचा शोध सुरू करतात, हे असे काहीतरी इच्छुक उमेदवार करतात, असे उदाहरण त्यांनी दिले. एवढय़ावर बोलून न थांबता त्यांनी अशा कार्यकर्त्यांची ‘हुशारी’ बाहेर काढली. तुम्ही कितीही हुशार असला तरी तुम्ही ज्या शाळेत शिकता ना, त्याचा मी ‘हेडमास्तर’ आहे, असा दमदार ‘डायलॉग’ त्यांनी टाकला. माझ्याशी ‘बनबाबनवी’ करण्याच्या भानगडीत पडू नका, अशी ‘दादा’ शैलीत तंबीही त्यांनी दिली. पुण्याच्या कार्यशाळेत अजित पवार हे बोलले असले तरी त्याचा संदर्भ पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांना व इच्छुक उमेदवारांना जास्त प्रमाणात लागू पडतो. गेल्या काही महिन्यांतील शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी पाहता त्यांच्या ‘हेडमास्तर’ होण्याची गरज पिंपरी-चिंचवडमध्ये जास्त आहे, हे उघड गुपित आहे.
मुळात पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘गावखाती’ स्वरूपाचे आहे, याची पुरेपूर कल्पना अजित पवारांना आहे. एखाद्या गावात जशा ‘बारा भानगडी’ असू शकतात, तसे काहीसे वातावरण शहराच्या राजकारणात आहे आणि त्याला बऱ्याच वर्षांची परंपराही आहे. अजित पवार शहराच्या राजकारणात पवार उतरले, तेव्हा दिवंगत रामकृष्ण मोरे यांचे बस्तान होते. सुरुवातीच्या काळात अजित पवारांना बऱ्याच प्रतिकूल गोष्टींना सामोरे जावे लागले. मात्र, राजकीयदृष्टय़ा पाय रोवल्यानंतर शहरात गटातटाचे राजकारण सुरू झाले. पुढे ते वाढल्याने एकत्रित काँग्रेसमध्ये पवार गट व मोरे गट अशी गटबाजी सुरू झाली. दोन्ही नेत्यांमधील वाद कायम राहतील व आपल्याला हवे ते निर्णय घेता येतील, अशी सोयीस्कर भूमिका ठेवणारे कार्यकर्ते, नेते तेव्हाही होते आणि आजही आहे. महापौरपदासाठी पूर्वी नेत्यांकडून बंद पाकिटात नाव यायचे, ते नाव मुंबईहून अथवा बारामतीतून पिंपरी-चिंचवडला येईपर्यंत बदललेले असायचे. तिकिटांची कापाकापी व त्यानंतरचे बंडखोरीचे नाटय़ हा तर जुना खेळ आहे, तो वेळोवेळी व्यवस्थित खेळला जातो. आता ‘फिक्सिंग’चा उद्योग जोमात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व पक्षांत मिळून जे काही स्थानिक नेते आहेत, त्यातील एखाददुसरा अपवाद वगळता या मंडळींची आतून हातमिळवणी आहे. वरकरणी वेगवेगळी राजकीय भूमिका दाखवतानाच एकजुटीने महापालिकेला चुना लावण्याचे काम इमानेइतबारे ते करतात. पालिकेचे कंत्राटदार, ठेकेदार, अधिकारी या मंडळींनी वाटून घेतलेले आहेत. निवडून आलेले नगरसेवक पक्षाचे म्हणून ओळखले जात नाहीत. तर या गटाचे आणि त्या गटाचे, असे शिक्के त्यांच्यावर मारले जातात. नेत्यांनाच टोपी घालणारे शेकडो कार्यकर्ते इथे आहेत. ते फक्त राष्ट्रवादीत आहेत असे काही नाही. जवळपास सर्वच पक्षांत त्यांचा मुक्त संचार आहे. मात्र, अशा ‘बनवाबनवी’चा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे आणि यापुढेही बसण्याची शक्यता आहे. २०१२च्या निवडणुकीत अपक्षांसह राष्ट्रवादीचे संख्याबळ ९३ इतके होते. २०१७च्या निवडणुकांना सामोरे जात असताना ही संख्या कमालीची घसरलेली दिसते आहे. पक्षनिष्ठा खुंटीला टांगून व्यक्तिपूजेचे महत्त्व जोपासत प्रत्येकाने आपापल्या नेत्याच्या मागे जाण्याची भूमिका घेतली. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थक भाजपमध्ये दाखल झाले. दुसरे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थकही भाजपमध्ये जाण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. राष्ट्रवादीच्या जिवावर मोठे झालेल्या जगताप, लांडगे यांनी राष्ट्रवादीलाच खिंडार पाडले, याचा अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा पिंपरी पालिकेतील कारभार पाहणाऱ्या माजी महापौर योगेश बहल व मंगला कदम यांच्या कार्यपद्धतीने पक्षाची वाट लागल्याचा आरोप पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी सातत्याने करत आहेत. माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, माजी महापौर आझम पानसरे पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची नाराजी वेगळय़ा स्वरूपाची आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी ‘धक्कादायक’ गोष्टी होणारच नाहीत, याची खात्री नाही. गेल्या काही महिन्यांच्या घडामोडी पाहता अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांवर विश्वास न ठेवता सरसकट सगळी सूत्रे स्वत:च्या हातात घेतली आहेत. पक्षाला खड्डय़ात घालणारी स्थानिक पातळीवरील ‘मॅचफिक्सिंग’ त्यांना नको आहे. या सर्व प्रकारांना पायबंद घालण्यासाठीच ‘हेडमास्तर’ बनून आता ‘हातात छडी’ घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बनवाबनवी’ची थोर परंपरा असल्याने अजित पवारांचे मनसुबे कितपत यशस्वी होणार, याविषयी शंकाच आहे.
[jwplayer Ac6UmSMH]