भाजपाचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खराब असतानाही ते पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपा गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “गिरीश बापट यांना खरंच प्रचारात आणण्याची गरज होती का हे मला माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना मी भेटून आलो. त्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा आहे.”

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणार आहात का?

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणार आहात का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “उमेदवार मला भेटले होते. त्यांनी एखादी चक्कर टाका असं सांगितलं. त्यामुळे विचार करू. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी गेलो, कसब्यातही जावं लागेल. एका ठिकाणी गेलं तर दोन्ही ठिकाणी जावं लागतं.”

जोतिर्लिंगांवरून आसाम सरकारला पवारांनी फटकारलं

आसामने ज्योतिर्लिंग भीमाशंकरला नाही, तर आमच्याकडे असल्याचा दावा केला. यावर शरद पवार म्हणाले, “अवघ्या देशाला माहीत आहे की १२ ज्योतिर्लिंग कुठे आहेत. असं असताना ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यापेक्षा वेगळं काय सांगणार आहे.”

हेही वाचा : “गिरीश बापटांनी कसब्याचा गड मजबूत केला, त्यांचा शब्द…”, देवेंद्र फडणवीस व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले…

शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी मंगळवारी (२१ फेब्रुवारी) घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचं मी ऐकलं. मंगळवारी काय होतं ते बघुयात. सध्या ‘इंटरेस्टिंग’ घडतं आहे. आत्ता काय होईल हे सांगणं अवघड आहे.”

शरद पवारांनी यावेळी फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मला देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं आणखी महत्त्व वाढवावं असं मला वाटत नाही. त्यांनी इतक्या दिवसांनी यावर वक्तव्य का केलं हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे.”