राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गटात विभागला गेला. या फूटीनंतर दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर सडकून टीका करत आलेत. दोन्ही गटात तणाव निर्माण झालेला असताना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (अजित पवार गट) यांनी शुक्रवारी (१० नोव्हेंबर) शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंब दिवाळीनिमित्त उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी एकत्र आले. या भेटीनंतर अजित पवार लगेचच दिल्लीला गेले. यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या. या भेटीवर स्वतः शरद पवारांनी अगदी मोजकी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१० नोव्हेंबर) या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “ही दिवाळीच्या निमित्ताने झालेली कौटुंबिक भेट होती. आजच्या भेटीत चर्चा झाली नाही.”

पवार कुटुंबाच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

प्रतापराव पवार यांच्या घरी झालेल्या भेटीगाठीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवारांची प्रकृती १०० टक्के ठिक नाही. त्यामुळे अजित पवारांना काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. त्यात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दिल्ली, मुंबई, आणि पुण्यात हवामान अतिशय वाईट आहे.”

हेही वाचा : दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि शरद पवारांची भेट, जयंत पाटील म्हणाले…

“आमची कुणाशीही व्यक्तिगत लढाई नाही”

“हा फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजनी पाटील या शरद पवार यांच्या बहीण आहेत. एन. डी पाटील आणि शरद पवार यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला. मात्र, व्यक्तिगत नात्यात कधीही दुरावा आला नाही. आमची कुणाशीही व्यक्तिगत लढाई नाही,” असं सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या भेटीवर म्हटलं.

Story img Loader