राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. यानंतर आता अजित पवार या पदासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याची जोरदार चर्चा आहे. या तर्कवितर्कांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (२ जुलै) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “या विषयी एक बैठक मीच बोलावली आहे आणि ती बैठक ६ जुलै रोजी होणार आहे. त्यात संघटनेत कुठे काही पुनर्रचना आहे का यावर चर्चा होईल. तसेच महिला, युवक, अल्पसंख्याक या शाखांमध्ये काही बदल करायचा का हाही विषय असेल.”

“वय ओलांडूनही काही लोक युवक काँग्रेसमध्ये काम करतात”

“अजित पवारांनी काही गोष्टी सुचवल्या होत्या. विशिष्ट वयापर्यंतच युवक काँग्रेसमध्ये काम केलं जातं. मात्र, ते वय ओलांडूनही काही लोक काम करतात. असं न करता नव्या लोकांना संधी द्यावी, अशी त्यांची सूचना होती. त्या सगळ्याचा विचार प्रमुख लोकांनी बसून करावा या हेतूने ६ जुलैची बैठक बोलावली आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं.

“६ जुलैची प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली”

“अजित पवारांनी जी बैठक बोलावली ती आमदारांची बैठक असेल. कारण विरोधी पक्षनेतेपद अजित पवारांकडे आहे. त्यामुळे त्यांच्या त्या बैठका होतच असतात. ६ जुलैच्या बैठकीत पक्षातील प्रमुख लोकांना मी निमंत्रित केलं आहे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on speculations about ajit pawar pressure game pbs
Show comments