घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची व्यवस्था चोखपणाने व्हावी यामध्ये लक्ष देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे संमेलनाच्या संयोजकांचा उत्साह दुणावला आहे.
पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, संयोजक संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. संमेलनाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याची विनंती करीत त्यांनी पवार यांना निमंत्रण दिले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे या वेळी उपस्थित होते.
शरद पवार यांनी संमेलनाच्या तयारीची माहिती घेतली. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांच्याशी संपर्क साधून सरकारतर्फे सहकार्य करण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे साहित्यिकांसाठी पुणे-अमृतसर अशी विमानसेवा देण्यासंदर्भात त्यांनी ‘गो एअरलाईन्स’चे मालक वाडिया यांच्याशी संवाद साधला. या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी तब्बल दोन तास चर्चा केली. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोण उभे आहेत याची माहिती घेत पवार यांनी ‘आता मतपत्रिका गोळा करायला सुरुवात झाली की नाही’, अशी गुगलीही टाकली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2014 रोजी प्रकाशित
घुमान साहित्य संमेलनाला शरद पवार यांचे सहकार्य
घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची व्यवस्था चोखपणाने व्हावी यामध्ये लक्ष देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वतोपरी सहकार्य केले आहे.

First published on: 10-11-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar cooperates ghuman sammelan