लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मागील आठ वर्षांपासून राज्याची सूत्रे भाजपकडे आहेत. भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले. केंद्रित झालेली सत्ता भ्रष्ट आहे. त्यामुळे महायुती सरकारला उलथवून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच, लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिल्याने भाजपचा राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन आम्ही थांबवू शकलो, असेही ते म्हणाले.

Pratibha Pawar, Supriya Sule And Sharad Pawar.
Pratibha Pawar: “बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखले”, सुप्रिया सुळेंच्या दाव्यामुळे राजकारण तापले
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
office bearers of BJP and NCP joined sharad pawar NCP in Hadapsar and Vadgaon Sheri
हडपसर, वडगाव शेरीमध्ये शरद पवारांचा ‘मास्टर स्ट्रोक’!
What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, “पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला…”
tomorrow Sharad Pawars meeting in Bhosari first road show in Pimpri Chinchwad on Thursday
शरद पवार यांची उद्या भोसरीत सभा, तर गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच रोड शो

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी गावजत्रा मैदानावर पवार यांची सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर, माजी आमदार विलास लांडे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने चारशे पारचा नारा दिला. बहुमतासाठी चारशे जागांची आवश्यकता नसतानाही हा नारा दिला होता. कारण, राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला चारशे खासदार हवे होते. घटनेत सुधारणा करून सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा उद्देश भाजपचा होता. लोकशाही, घटनेवर होणारा हल्ला राज्यातील जनतेने हाणून पाडला. महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. त्यामुळे राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन थांबल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग आले. त्यामुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. देशाच्या बाहेर पिंपरी-चिंचवडचे नाव मोठे झाले. हिंजवडीत माहिती तंत्रज्ञाननगरी आणली. हिंजवडीत गेल्यावर परदेशात गेल्यासारखे वाटते. कोट्यवधी रुपयांची निर्यात हिंजवडीतून होते. परदेशातील कंपन्यांची मुख्य कार्यालये हिंजवडीत आहेत. शिक्षणानंतर उद्योग आणि आयटीचे माहेरघर म्हणून आता पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दी वाढल्याने चाकण, रांजणगाव, शिरवळ, तळेगाव दाभाडे या भागात नवीन कारखानदारी उभी केली.

आणखी वाचा-आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारताला मोठी संधी! प्रादेशिक विदा केंद्र उभे राहणार

एकीकडे राज्य शासन लाडकी बहीण योजना राबवत आहे. दुसरीकडे मात्र, राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील दोन मुलींवर अत्याचार झाले, या घटनेमुळे राज्याचे नाव खराब झाले. गेल्या वर्षभरात ८८६ मुली बेपत्ता आहेत. मग, शासन बहिणींची काय काळजी घेत आहे, असा सवालही पवार यांनी केला.