पुणे : पिंपरी- चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात एकमेकांचे राजकीय स्पर्धक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले.
नाट्यसंमेलनासाठी उपस्थितांचा सत्कार सुरू असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना खुणावले. सत्कारासाठी व्यासपीठावरील मान्यवर उभे राहिले होते. एकनाथ शिंदे आणि शरद पवार शेजारी उभे होते. त्यावेळी सत्कार संपल्यानंतर एकनाथ शिंदे उभेच राहिले. हे पाहून पवार यांनी त्यांना खुणावत खुर्चीवर बसण्याची सूचना केली.
हेही वाचा : “आम्ही केवळ तीन तास अभिनय करतो, तर राजकीय लोक…”; प्रशांत दामले यांची फटकेबाजी
पिंपरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाट्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नाट्य परिषदेचे विश्वास्त, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नाट्यंमेलनाला प्रारंभ झाला. त्यावेळी हा प्रसंग घडला. या नाट्य संमेलनाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठविली आहे.