छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच ती वाघ नखं पुढील तीन वर्षांसाठी राज्य सरकार महाराष्ट्रात आणणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी (१ ऑक्टोबर) ब्रिटनला रवाना होणार आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी वाघ नखासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, सरकारनं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये, असं मत व्यक्त केलं. या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१ ऑक्टोबर) पुण्यातील जुन्नर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “मला काही त्यातलं ज्ञान नाही. मात्र, इंद्रजीत सावंत हे मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार आहेत. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांबाबत वेगळं मत आहे हे मी टीव्हीवर पाहिलं. असं असलं तरी मला प्रत्यक्षात त्याबाबत माहिती नाही. तसेच त्याबाबत वाद निर्माण करावा असं मला वाटत नाही.”

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचं म्हणणं काय?

इंद्रजित सावंत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघ नखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. १९१९ पर्यंत होती. कारण, ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण, आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघ नखं महाराष्ट्र सरकार भारतात परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघ नखं नाहीत हे स्पष्ट आहे.”

“ती वाघ नखे शिवाजी महाराजांची असूच शकत नाही”

“साताऱ्यात इ.स. १९१९ पर्यंत वाघ नखे असल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत. मग, इ.स १९१९ च्या आधी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघ नखे ही शिवाजी महाराज यांची असूच शकत नाही,” असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलं.

“वाघ नखे ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला भेट”

इंद्रजित सावंत पुढे म्हणाले, “इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवलं होतं. त्या महाराजांनी ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता आणि प्रतापसिंह महाराजांशी त्याची चांगली दोस्ती होती. त्यांना भेट म्हणून वाघनखं दिली होती. ती वाघनखं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ग्रँट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रँट डफ यांना तिथे दिसली असून तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहेत. त्या वाघ नखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघ नखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही.”

हेही वाचा : “लंडनमधील वाघ नखे शिवाजी महाराजांची असतील तर…”, इंद्रजित सावंत यांचं सरकारला थेट आव्हान

“सरकारनं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये”

“शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखे आणण्याची कथा रचली जात आहे. हे साफ खोटं आहे. इतिहासाच्या कसोटीवर हे टिकणार नाही. सरकारनं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये. ही वाघ नखे शिवाजी महाराज यांच्या वापरातील असतील, तर त्याचे पुरावे सरकारनं सादर करावेत,” असं आव्हान इंद्रजित सावंत यांनी दिलं आहे.

Story img Loader