राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट भाजपा-शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी जनतेत जाण्याचं जाहीर केलं. मात्र, भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार शरद पवारही भाजपाबरोबर येतील अशी वक्तव्ये केली जात आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार भाजपाबरोबर येतील, असं मोठं वक्तव्य केलं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवार संतापले. ते शुक्रवारी (२५ ऑगस्ट) बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळेंनी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार भाजपाबरोबर येतील, असं मोठं वक्तव्य केलं. त्यावर विचारलं असता शरद पवार म्हणाले, “काहीही प्रश्न काय विचारता. तुम्ही अक्कल तरी वापरा.”
व्हिडीओ पाहा :
“महाविकासआघाडीला अधिक जागा मिळतील”
आगामी निवडणुकीवरील सर्व्हेवर बोलताना शरद पवार म्हणाले, “मी तो सर्व्ह बघितला नाही. त्या सर्व्हेला काय आधार, किती लोकांना आणि कुठल्या लोकांना विचारलं याचीही माहिती नाही. मात्र, आम्ही विविध संस्थांकडून माहिती घेतो आहे. त्यात आम्हाला असं दिसतं आहे की, महाविकासआघाडीला अधिक जागा मिळतील.”
हेही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले, काहीवेळा…”; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
“अजित पवार आमचे नेते”
यावेळी शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंनी केलेल्या अजित पवार आमचे नेते आहेत या वक्तव्याचं समर्थन केलं. ते म्हणाले, “अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे