पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा एकेकाळचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्यात आता शरद पवार गट मोठ्या ताकदीने राजकीय रिंगणात उतरला आहे. उद्या (शनिवारी) शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने शरद पवार गट पिंपरी-चिंचवडमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या उद्घाटनाला जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे हेदेखील उपस्थित असणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही शक्तिप्रदर्शन करत नाहीत. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पिंपरी- चिंचवड शहर हे शरद पवारांचं आहे. शरद पवार यांच्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – मराठा समाजाच्या सामाजिक मागसलेपणाच्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम, प्रस्ताव राज्य सरकारकडे

हेही वाचा – यंदा कडाक्याची थंडी नाहीच ? हवामान विभागाचा अंदाज; डिसेंबरही सरासरीपेक्षा उष्ण राहणार

पिंपरी- चिंचवड शहर हे अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून नेहमीच ओळखला जातो. या ठिकाणचा विकास अजित पवार यांनीच केल्याचं त्यांचे कार्यकर्ते रोखठोकपणे सांगतात. परंतु, याच बालेकिल्ल्याला आता सुरुंग लावण्यासाठी शरद पवार गट सज्ज झाला आहे. उद्या शनिवारी पिंपरीतील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील, यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे हे देखील असतील. नेमकं सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर जयंत पाटील काय भाष्य करतात याकडे देखील अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. नुकतंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर कर्जत येथे पार पडले. अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यासह शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर बारामती लोकसभेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे यावर देखील ते काही बोलतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास तरी पिंपरी- चिंचवड शहर हा अजित पवारांचा बालेकिल्ला खेचून आणण्यासाठी शरद पवार गट कामाला लागल्याचं बघायला मिळत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar group power show in pimpri chinchwad tomorrow kjp 91 ssb
Show comments