पुणे : शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून लावतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
हेही वाचा >>> “सध्या आम्ही विरोधात पण २०२४ ला सत्ता…” कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला विश्वास
कसबा पोटनिवडणुकीतील विजय हा रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. महाविकास आघाडीचा नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.या वरून शरद पवार यांनी फडणवीस यांनाही उत्तर दिले. ज्यांचा विजय झाला, ते आमचे उमेदवार होते, हे तरी त्यांनी मान्य केले, . या निवडणुकीच्या आधी त्यांची विधाने काय होती हे पाहिला तर त्यांच्यात आता गुणात्मक बदल झाला आहे, हे दिसून येते, असे पवार म्हणाले. फडणवीस निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगले आहे, असा चिमटा ही त्यांनी काढला.
हेही वाचा >>> ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला; म्हणाले, “चांगली गोष्ट आहे, किमान त्यांनी…!”
कसब्याची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र निवडणूक हिंदुत्वावर गेली की, नाही हे माहीत नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी काम करत होते. त्याचा हा परिणाम आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. कसबा पोटनिवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर झाला. मला काही लोकांनी भ्रमणध्वनीवर नोटांची छायाचित्रे दाखवली, ती सामान्य कार्यकर्ते होते. भाजपच्या पारंपारिक मतदारालाही ते आवडले नाही. नाही. मात्र भाजपचे नेते हे कबूल करत नाहीत, असे पवार यांनी सांगितले.