शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती होण्याची घोषणा केल्यापासून दोन दिवस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली. पण, पक्षनेते, कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीचा निर्णय मागे घेत अध्यक्षपदी कायम राहण्याची घोषणा शरद पवारांनी शुक्रवारी ( ५ मे ) केली. या निर्णयानंतर शरद पवार आज ( ६ मे ) बारामती दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्ष, बारसू आणि अजित पवार यांच्यावर भाष्य केलं.

सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यावर राज्यातील राजकीय चित्र बदलेल का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी सांगितलं, “न्यायालयात ज्यांच्याविरोधात केस आहे, त्यांच्याविरुद्ध निकाल लागला, तरी विधानसभेतील बहुमतावर काहीही परिणाम होणार नाही.”

592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
air pollution issue ignore in in delhi assembly elections
‘शुद्ध हवा’ नावडे दिल्लीकरांना…
Spontaneous response to exhibition of Shiva era weapons in Karad
शिवकालीन शस्त्रे पाहताना आबालवृद्ध भारावले, कराडमधील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Effects of climate change on agriculture Global warming Cyclone
शेतकऱ्याच्या अनुभवांचे बोल मोलाचे!
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?

हेही वाचा : “काहीजण शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले होते, पण…”, जयंत पाटलांचं विधान

बारसूतील आंदोलनाबद्दल विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “तेथील शेतकऱ्यांशी स्वत:हा मी चर्चा करत, त्यांचे प्रश्न समजून घेतले आहेत. उद्योगमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही झाल्या आहेत. प्रकल्प होत असताना पर्यावरण, शेती मत्स्यव्यसायाचे नुकसान होणार नाही. याची खबरदारी घ्यावी लागेल. यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढं जाण्याची आवश्यकता आहे. सक्तीने किंवा पोलिसांचा वापर करून हा प्रकल्प यशस्वी होऊ शकणार नाही. ते योग्यही नाही,” अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे.

राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांबरोबर बाहेर जाण्याची सातत्याने चर्चा का केली जाते? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी सांगितलं, “सातत्याने काही घडलं का? काही लोक प्रचार करतात. काहींच्या कामाची पद्धत वेगळी असते. मी कुठेही गेलो, तर माध्यमांना बोलतो. पण, अजित पवार हे जमिनीवर काम करणारे आहेत. ते फार माध्यमस्नेही नाहीत.”

हेही वाचा : बारसूत पोलीस आणि भास्कर जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक; नेमकं घडलं काय?

“काहीजण वृत्तपत्रात नाव कसे येईल, याची काळजी घेतात. अजित पवारांना वृत्तपत्रात प्रसिद्धीची चिंता नसते. आपण हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याची चिंता त्यांना असते. हा स्वभावातला फरक आहे. त्यामुळे असे गैरसमज पसवले जातात… असं काही नाही आहे,” असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे.

Story img Loader