इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना पक्ष अदाणी समूह आणि समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्या विरोधात आक्रमक झालेली असताना दुसरीकडे इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार मात्र गौतम अदाणी यांची बाजू घेऊन वारंवार कौतुक करताना दिसतात. नुकतेच बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबोटिक लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी शरद पवार यांनी गौतम अदाणींचे आभार मानले.

विद्याप्रतिष्ठान सोहळ्याला संबोधित करत असताना पवार म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. हे नवीन बदल स्वीकारून त्या बदलांना सामोरे जाणारा वर्ग तयार करण्याची नितांत गरज आहे. नव्या तंत्रज्ञानाला युक्त कुशल अभियांत्रिकांची देशात व परदेशामध्ये मोठी गरज निर्माण झाली आहे. या सर्व आव्हानांचा व संधींचा विचार करून बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळपास चार हजार चौरस फुटावर ग्रामीण भागाचं पहिल्या स्मार्ट फॅक्ट्रीला नियमित करण्याचा निर्णय आपण घेतला व त्याचे काम आज या ठिकाणी सुरु झालेले आहे.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे वाचा >> शरद पवार अदाणींच्या भेटीसाठी गुजरातमध्ये, राजकीय चर्चांना उधाण; रोहित पवार म्हणाले…

गौतम अदाणी यांची २५ कोटींची मदत

“या प्रकल्पाला पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत. सिफोटेक कन्स्ट्रक्शन कंपनीने १० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला, त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. गौतम अदाणी यांचे नाव या ठिकाणी घ्यावे लागेल. त्यांनी पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे, या दोघांच्या मदतीने विद्याप्रतिष्ठानमधील प्रकल्प आज या ठिकाणी उभे करणार आहोत”, अशा शब्दात शरद पवार यांनी गौतम अदाणींचे आभार मानले.

हे वाचा >> शरद पवारांनी गौतम अदाणींना दिला होता ‘तो’ सल्ला; स्वत: आत्मकथेत केला उल्लेख; म्हणाले, “मी त्यांना सुचवलं होतं की…!”

अदाणी अनेक संस्थांना मदत देतात – संजय राऊत

शरद पवार यांच्या संस्थेला मदत केल्याच्या प्रकरणावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “उद्योगपती अनेक शैक्षणिक संस्थांना मदत देत असतात. त्याप्रमाणे गौतम अदाणी शरद पवार यांच्या संस्थेला मदत केली असावी. त्यावर आक्षेप घेण्याचे कोणतेच कारण नाही. आमचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अदाणी यांना विरोध आहे आणि तो पुढेही कायम राहिल. तसेच गौतम अदाणी यांनी पीएम केअर फंडलाही मदत केलेली आहे.”

अदाणी समूहाची पवारांनी केली होती पाठराखण

२०२३ च्या सुरुवातीला आलेल्या हिंडेनबर्ग अहवालानंतर विरोधकांनी अदानी समूहाबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अदाणी समूहावर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेसच्या वतीने देशभरात आंदोलने करण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका मांडली होती. तसेच अदाणी समूहाची पाठराखण केली होती. ‘‘हिंडेनबर्ग अहवालातून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दयावरून संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत बराच काळ कामकाज होऊ शकले नाही. त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यानंतर संयुक्त चिकित्सा समितीची मागणी लावून धरणे योग्य नाही. अहवालाच्या मुद्दयावरून देशभरात गोंधळ झाला आणि त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली’’, असे मत पवार यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.

Story img Loader