पुणे पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यानंतर आता आमदार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी रुग्णालयात जाऊन आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, “रात्री-अपरात्री प्रवास करणं टाळायला पाहिजे. पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. मात्र सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

व्हिडीओ पाहा:

जयकुमार गोरेंची प्रकृती स्थिर- रुबी हॉल क्लिनिक

आमदार जयकुमार गोरे यांचा शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला. सातारा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या न्यूरो ट्रॉमा विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. रुबी हॅाल क्लिनिक प्रशासनातर्फे याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reaction on mla jaykumar gore car accident at phaltan pune svk 88 rmm