पिंपरी-चिंचवड : शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या हा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो. अर्थकारण जर व्यवस्थित राहिलं नाही तर कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो. ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा विचार आपण एकत्रितपणे करायला हवा असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघटना अधिवेशनात बोलत होते. 

शरद पवार म्हणाले की, १९०७ साली या संस्थेची स्थापना झाली. बारामती आणि फलटण भागातील एक शेतकरी होते. शास्त्रशुद्ध दृष्टिकोन त्यांनी ठेवला अन पुढाकार घेत, द्राक्ष बागायतदार संघाची स्थापना केली. शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे घटक हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. शेतीचा ही ते भाग आहेत. त्यांच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती सुरु आहे. असे देशात जवळपास ५ हजार शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यामुळे विज्ञान आणि शेतीचा समतोल राखला गेला. ३५ हजारांहून अधिकचे शेतकरी या संघटनेत लक्ष घालतात. त्यामुळेच आता ही शेती मर्यादित भागापूरती मार्यदित राहिलेली नाही. ती राज्याच्या विविध भागात विस्तारलेली आहे.

हेही वाचा : बाजारात उत्सवऊर्जा ; करोनानंतरच्या भीतीमुक्त वातावरणात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड

प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र द्राक्ष संघाने जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचं मी पाहिलं नाही. आज आपण दोन वर्षानंतर भेटतोय. या दरम्यान अनेक संकटं आली, यात द्राक्ष बागायतदारांना मोठी किंमत मोजावी लागली. गेली दोन वर्षे द्राक्ष निर्यातीला बंदी आली. अशात चायनाने निर्यातीच्या नियमांत अटी टाकल्या, त्यानंतर ज्या मर्यादा आल्या, त्यामुळं द्राक्ष शेतकऱ्यांचं नुकसान झालं. ८ टक्के द्राक्षाची निर्यात होते, तर ९२ टक्के द्राक्ष भारतीय बाजारपेठेत विक्री होतात. त्यामुळं स्थानिक बाजारपेठेत कशी मजबूत होईल.

हेही वाचा : नक्षलवाद हा डाव्यांचा विघटनवादी चेहरा ; प्रवीण दीक्षित यांचे मत

आर्थिक उलाढाल मोठी होईल याकडे लक्ष द्यायला हवं. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी आपण बोलू. वाईन विक्रीचं धोरण गेल्या राज्य सरकारने आणलं, हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही. आज ही ६०टक्के जनता शेती करतात. जगाची आणि देशाची लोकसंख्या पाहता, शेतकऱ्यांचा आकडा दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकसंख्या वाढत असताना शेतीवर बोजा किती टाकायचा याचाही विचार केला पाहिजे. 

Story img Loader