सन २०१९ मध्ये पहाटे सरकार बनविण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला. राष्ट्रपती राजवट उठली. असे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का, राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? मी जे सांगितले ते समजणाऱ्यांना कळते असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पवार चिंचवडमध्ये आले होते.आयोग निर्णय घेतोय की आयोगाला कोणाचे मार्गदर्शन आहे. असे निकाल यापूर्वी कधी झाले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तेचा गैरवापर करून नाव, चिन्ह शिंदे यांना सत्तेचा गैरवापर करून एखादा राजकीय पक्ष, त्याची खूण(चिन्ह) या सगळय़ाच गोष्टी कोणी हिसकावून घेते किंवा पळवते हे कधी या देशात घडलेले नव्हते. पक्षामध्ये अंतर पडले. काँग्रेस आय आणि काँग्रेस एस असे दोन पक्ष झाले होते. काँग्रेस एसचा मी अध्यक्ष होतो. काँग्रेस आयच्या प्रमुख इंदिरा गांधी होत्या. त्यावेळेला काँग्रेस नाव वापरण्याचा मला अधिकार होता. नाव काढून घेतले नाही. त्यांनी हात घेतला आणि आम्ही घडय़ाळ घेतले. त्याला निवडणूक आयोगाने कधी अडविले नाही. इथे निवडणूक आयोगाचे वैशिष्टय़े असे आहे की पक्षाचे नाव, चिन्ह हे सगळे दुसऱ्याला देण्याचा निर्णय आजपर्यंत या देशाच्या इतिहासात कधी घडला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar statement that president rule was lifted due to early morning oath taking amy
Show comments