पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरविले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर असणार आहेत. ‘टिळक पुरस्कारासाठी मी स्वत:च पंतप्रधानांची वेळ मिळवून दिली असल्याने तेथे जाणे हा माझा नाईलाज आहे’ असे खुद्द पवार यांनी सांगितल्याचा दावा युक्रांदचे डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी केला.
मोदी यांना मंगळवारी (१ ऑगस्ट) प्रदान करण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांची मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली.
पंतप्रधान बंदोबस्ताची रंगीत तालीम; रस्ते बंद केल्याने वाहतुकीचा बोजवारा; नागरिकांना मनस्ताप
पुणे: महापालिकेचा सर्व्हर डाऊन; मिळकतकर भरण्यास अडचणी
या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी विनंती करण्यात आली असली तरीही शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यावर ठाम आहेत. ‘टिळक पुरस्कारासाठी मी स्वत:च पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून दिली असल्याने, तेथे जाणे हा माझा नाईलाज आहे’ असे पवारांनी मला सांगितल्याचा दावा कुमार सप्तर्षी यांनी केला.