लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जुन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी या लढतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मतविभागणीचा लाभ अपक्ष उमेदवार, माजी आमदार शरद सोनावणे यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार निवडून येण्याची नोंद जुन्नर तालुक्यात झाली.

Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nagpur issue of Massajog Sarpanch Santosh Deshmukhs murder case Dhananjay Munde
अजित पवारांच्या पुढे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी घोषणा
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने कोणतंही ठोस…”
Sharad Sonawane Image.
Sharad Sonawane : “…तर किंमत थोडी वाढली असती, माझा पालापाचोळा झाला”, अपक्ष आमदाराचे वक्तव्य अन् सभागृह खळखळून हसलं
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
BJP MLA opposes Congress , Nagpur winter session,
शहांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात, काँग्रेसचे विरोधात…
Ajit Pawar, Nationalist congress Party, Hedgewar Smruti Mandir reshimbagh,
संघाविषयीच्या भूमिकेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, दोन आमदार संघस्थळी

जुन्नरचे अजित पवार समर्थक आमदार अतुल बेनके यांच्यापुढे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर यांचे आव्हान होते. मात्र, या मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली. जिल्हा परिषदेच्या नेत्या आशा बुचके यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असला, तरी खरी लढत बेनके, शेरकर आणि शरद सोनावणे यांच्यात होती. त्यामध्ये सोनावणे यांनी ६ हजार ६६४ मतांनी विजय प्राप्त करत बाजी मारली.

आणखी वाचा-पुण्यात काँग्रेसचा आता ना आमदार, ना खासदार!

जुन्नरचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, माजी आमदार अतुल बेनके यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या पक्षात जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात त्यांची शरद पवार यांच्याबरोबर भेटही झाली होती. त्यातच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मात्र, शेरकर आयात उमेदवार असल्याची चर्चा जुन्नर तालुक्यात सातत्याने होत होती. त्याबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतांची विभागणी झाली. त्याचा फायदा आमदार शरद सोनावणे यांना झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-घरांच्या किमतीची कोटीच्या कोटी उड्डाणे! तुमच्या शहरातील घरांच्या सरासरी किमती किती…

सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनीही सोनावणे यांना पाठिंबा दिला. सोनावणे यापूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेचे ते आमदार होते. त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. माजी आमदार दांगट यांनी सोनावणे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेतील मतेही स्वत:कडे वळविण्यात सोनावणे यशस्वी ठरल्याचे दिसून आले.

सोनावणे यांनी २०१९ ची निवडणूकही लढविली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत ७४ हजार ९५८ मते मिळवत बेनके यांनी विजय प्राप्त केला होता. सोनावणे यांना ९ हजार ६८ मते कमी पडली होती. त्या निवडणुकीत आघाडी म्हणून सत्यशील शेकर आणि बेनके एकत्र होते. या निवडणुकीत मात्र राजकीय गणिते बदलल्याचा फायदा सोनावणे यांना झाला.

Story img Loader