एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, खासदार, त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतरांनंतर उद्धव ठाकरे एकाकी पडल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे (uddhav-thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा सुरु होत्या. आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या विधानानंतर नव्या चर्चांना उधाण आले आहे. शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंच्या एकत्र य़ेण्यावर सूचक वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा- “१४ दिवस कारागृहात राहणाऱ्या राणा दाम्पत्याचा मला अभिमान”; देवेंद्र फडणवीसांचं अमरावतीत वक्तव्य
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यालाही शुभेच्छा
पुण्यात मनसेच्या “गणपती आमचा किंमत तुमची २०२२” या आयेजित उपक्रमाचे त्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यालाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी “साद घातली तर येूऊ देत” हे त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते आहे.
हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर पुन्हा टीका; म्हणाले, “गद्दारांना…”
“माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील”
“आपले रस्ते चांगले होतील अशी आपण इच्छ व्यक्त करुयात. काम करण्याची मानसिकता हवी. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असं मला वाटतं,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं.