जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय विद्याभवनच्या स्नेहवíधनी महिला मंडळाच्या वतीने ‘स्त्री’चे भावविश्व आणि तिची घुसमट संगीत, गायन, नाटक आणि नृत्याच्या कार्यक्रमातून उलगडून दाखविले.
गेल्या काही दिवसांत महिलांवरील वाढते अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या यांच्या पाश्र्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘तिचे’ दु:ख मांडण्यासाठी स्नेहवíधनी मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यातील पहिल्या भागात ‘ती’ ला बोलायचेय’ या कार्यक्रमात स्त्रीचे भावविश्व उलगडून दाखवले. मुलीच्या जन्मापासून सुरू होणारा तिचा प्रवास पुढे तिची वेगवेगळी रूपे दाखवत तिला कुठल्या-कुठल्या अवस्थांमधून जावे लागते हेच या कार्यक्रमातून उलगडत जाते. तिचा भावनिक कोंडमारा, तिच्यावरील कौटुंबिक अत्याचार इथपासून ते वेश्यांच्या दारुण स्थितीपर्यंतच्या तिच्या व्यथा आणि कथांचा आढावा या कार्यक्रमात घेतला गेला. कथा, कविता आणि गायन-संगीताच्या साथीने सादर झालेल्या या कार्यक्रमाचे संहिता लेखन सुजाता शेणई व वैशाली दाबके यांनी केले होते व गीतांचे गायन अपर्णा राहुरकर व तनया राहुरकर यांनी केले होते. साथसंगत माधवी करंदीकर व केदार करंदीकर यांनी केली होती.
कार्यक्रमाच्या दुसरा भागात सध्याची ज्वलंत समस्या असलेल्या ‘स्त्री भ्रूण हत्ये’वर  ‘बालिका कांड’ या एकांकिकेतून प्रकाश टाकला. ज्येष्ठ महिलांनी सादर केलेल्या या एकांकिकेत शुभांगी फडणवीस, रंजना जोशी, गीता कोलंगडे, मीनल चिंधडे, उज्ज्वला दाबक, सुनंदा वर्मा व बालकलाकार रुजुल पोतनीस यांनी भाग घेतला. विद्या बापट यांनी या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दै. लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते झाले. मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला दाबक यांनी प्रास्ताविक केले. चित्रा भट यांनी सूत्रसंचालन तर सुनंदा पांढरकर यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा