पुणे : शहरातील जुन्या ‘प्रभात ब्रास बँड’चे संचालक आणि तब्बल ५६ वर्षे बँडपथकामध्ये वादन करणारे कलाकार गजानन उर्फ शेखर सोलापूरकर (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, संगीतकार निनाद सोलापूरकर आणि प्रशांत सोलापूरकर हे दोन मुलगे असा परिवार आहे. प्रभात ब्रास बँडचे संस्थापक स्वर्गीय बंडोपंत सोलापूरकर यांचे शेखर हे पुत्र होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बँडपथकामध्ये पट्टीतरंग, क्लॅरोनेट आणि सिंथेसायझर वादन करण्यामध्ये सोलापूरकर यांचा हातखंडा होता. गांधर्व महाविद्यालयातून संवादिनीवादनाचे शिक्षण घेतलेल्या शेखर यांनी वडील सूरमणी बंडोपंत यांच्याकडून क्लॅरोनेटवादनाची कला आत्मसात केली. बँडवर भक्तिगीत, भावगीत, राष्ट्रभक्तीपर गीत तसेच शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीत वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी काही काळ पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये राम किंकर यांच्यासाठी संगीत संयोजनाचे काम केले होते.

हेही वाचा >>>बँक व्यवस्थापकाला धक्काबुक्की करून गोंधळ घालणारे अटकेत, लाडकी बहीण योजनेतील कागदपत्रांवरुन अरेरावी

गणेशोत्सवात श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीत शेखर सोलापूरकर यांनी ५६ वर्षे आपली सेवा अर्पण केली. त्याचबरोबर आषाढी वारी मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी समोर त्यांनी अनेकदा वादन केले होते. बँडवादन कलेत त्यांनी अनेक कलाकार तयार केले.