पुणे: महाविकास आघाडी सरकारमधून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.या घटनेला जवळपास दोन वर्षाचा काळ होऊन गेला.पण या संपूर्ण कालावधीत ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये तसेच नेत्यांमध्ये दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याच बरोबर या दोन्ही गटातील नेते आणि मंत्री एकाच व्यासपीठावर येण्याच आजवर टाळत आले आहे.पण आज पुणे शहरात गणेशोत्सवानिमित्त शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोन्ही नेत्यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शना निमित्त एकाच वेळी भेट झाली.त्यावेळी दोघांनी हस्तांदोलन करीत गप्पा देखील मारल्या.त्यावेळी शंभूराज देसाई यांनी अंबादास दानवे यांना कुटुंबातील सर्व व्यक्तीची ओळख करून दिली. तर यावेळी अंबादास दानवे आणि शंभूराज देसाई दोघांनी गळाभेट घेतली.या गळाभेटी राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction leader shambhuraj desai and thackeray faction leader ambadas danve took darshan of shrimant dagdusheth halwai ganapati svk 88 amy