पुणे प्रतिनिधी: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपा बाबत विधान केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारमधील अनेक चर्चाना उधाण आले आहे. त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या राज्य सरकार मधील अंतर्गत घटना सर्वांना माहिती असून त्यामुळे हे सरकार फार काही काळ तग धरू शकणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील आमदाराच्या भावनावर एकमत होणे अवघड दिसत आहे. त्यामुळे हे सरकार जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल आणि हे सरकार एक दिवशी थांबेल अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

राज्याच्या कृषी मंत्र्यांना अजिबात गांभीर्य नाही

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे बेताल वक्तव्य करीत आहे. त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्याच्या कृषी मंत्र्यांना अजिबात गांभीर्य नाही.तसेच तो विषय त्यांना समजतो का नाही. त्याबाबत मला माहिती नाही असे सांगत अब्दुल सत्तार यांना त्यांनी टोला लगावला.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
Chief Minister Eknath shinde understanding of independent parties in Thane print politics news
ठाण्यातील स्वपक्षीय नाराजांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत,प्रचाराला लागण्याचे आदेश; केळकर यांनाही कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्ला

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला

भाजपचे नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला खंडणीच्या प्रकरणाला सामोरे जावे लागले आहे. त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, अंतिम आठवड्याचा प्रस्ताव गृह विभागा संदर्भात असणार आहे. त्यावेळी मागील काही महिन्यात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत जाब विचारणार असून त्या विषयावर देखील आम्ही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले पाहिजे

जुन्या पेन्शन मागणीसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍याचे पंचनामे झाले नाही.यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारच्या बाजूने पंचनामे झाले पाहिजे.मात्र ते होताना दिसत नसून कर्मचारी संपावर असल्याच राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. हे काही योग्य नसून राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कोणत्याही परिस्थितीत सानुग्रह अनुदान दिले पाहिजे. या मागणीसाठी आम्ही उद्या विधिमंडळात आवाज उठवणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारकडून केवळ जाहिरात बाजी सुरू

राज्य सरकारमार्फत गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केली.पण कर्मचारी संपावर गेल्याने शिधा गोडाऊनमध्येच पडून आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार केवळ घोषणा करणार आहे. या सरकारकडून अखेरच्या नागरिकापर्यंत विकास काम किंवा मदत पोहोचत नाही. सध्या केवळ जाहिरातबाजी सुरू असल्याच सांगत केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली.