शिरुर : १० वर्षाच्या अपहरण झालेल्या बालिकेची सुटका करत पोलीसांनी ३ आरोपीना ताब्यात घेतले आहे . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ मार्च २०२५ रोजी सकाळी आठ ते दुपारी १ च्या दरम्यान शिरुर शहरातील जोशीवाडी येथील राहत्या घरा समोरून १० वर्षीय अल्पवयीन बालिकेस अमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली . या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या गुन्हयाची गंभीरता व संवेदनशीलता लक्षात घेता पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्हयातील अपहरण झालेल्या बालिकेचा व अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड यांनी अपहरण झालेली बालिका व अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरीता शिरूर शहरामधील सुमारे १०० पेक्षा अधिक सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. तपास करीत असताना गुन्हा घडलेल्या ठिकाणापासुन सी .सी .टी .व्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषन केले असता अपहरण झालेल्या बालिकेचे १) लताबाई बसीर काळे २) आकाश बसीर काळे ३) सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे, सर्व रा .सोने सांगवी, ता. शिरूर जि .पुणे हे यांनी या बालिकेचे अपहरण केल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाल्यावर १) लताबाई बसीर काळे २) आकाश बसीर काळे ३) सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे यांना ताब्यात घेण्यात आले . आरोपीनी बालिकेचे अपहरण करून तीला बेलापूर मुंबई येथे नातेवाईकांकडे ठेवले होते. नातेवाईकांकडे ठेवताना ही मुलगी आमची असुन आम्ही उपचारासाठी दवाखान्यामध्ये जात आहोत. आम्ही परत आल्यावर तीला घेवून जातो असे खोटे सांगितले होते. अपहरण झालेल्या बालिकेस बेलापूर येथून पोलीस पथक शिरुरला घेवून आले व या बालिकेस नातेवाईकांकडे सूपूर्त केले .