शिरुर : शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची असणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज पासून सुरु झाली . शिरुर तालुक्यातून ६६८४ विद्यार्थी परीक्षा देत आहे . तालुक्यात एकूण १५ परीक्षा केंद्र आहेत . शहरातील विद्याधाम प्रशाला परीक्षा केंद्रावर – ६६२ , न्यु इंग्लिश स्कूल शिरुर -६०४ , मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे -५५३ ,बापुसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी -३५७ , वाघेश्वर विद्याधाम प्रशाला मांडवगण फराटा -२१९ , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी -३५७ , विद्याधाम प्रशाला शिक्रापूर -९७७ , स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशाला तळेगाव – ५३० , विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी -३१४ , छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई – ३२९ , श्री . भैरवनाथ विद्यालय करडे -४३८ ,श्री संभाजी राजे विद्यालय जातेगाव -३६३ , छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव -४०९ , न्यू इंग्लिश स्कूल मलठण -४९७ , सरदार रघुनाथ ढवळे विद्यालय केंदुर -१०२ अशी परीक्षा केंद्रावर बसलेक्या विद्यार्थ्यांची संख्या असल्याची माहिती गटशिक्षण आधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिली .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान विद्याधाम प्रशाला येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पालक समितीचा वतीने गुलाबपुष्प व पेन देवुन स्वागत करण्यात आले प्राचार्य फोरमचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य चंदुलाल चोरडिया , मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे , प्रा . देशपांडे , बालाजी स्कूलचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे , ज्ञानगंगा स्कूलचे मुख्याध्यापक संतोष येवले , उपमुख्याध्यापिका जयश्री खणसे , शालेय समिती उपाध्यक्ष ह . भ प .संभाजी महाराज दराडे ,राजेंद्र बनकर ,संध्या औटी ,मीना तांबे , अर्चना तांबे , पोपट पाचंगे आदी यावेळी उपस्थित होते . परीक्षेचा पहिला दिवस असल्याने अनेक पालक विद्यार्थ्याना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते .