पुणे : शिवजयंती महोत्सव समिती पुणेच्या वतीने लालमहाल येथून भव्यदिव्य मिरवणुक काढण्यात आली. यंदा या मिरवणुकीच १३ वं वर्ष आहे. जय शिवाजी जय भवानीचा जयघोष करत स्वराज्यातील सरदारांच्या घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत, मुख्य स्वराज्यरथ, एकापाठोपाठ येणारे सरदारांचे,मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना आणि ढोलताशा पथकाचं सुरेख वादन, तर सनई-चौघडयांचे मंगलमय सूर, तसेच हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्त यांनी मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा