भाजप, पुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कार्यकर्त्यांची शिबिरे, मेळावे, प्रशिक्षण आदी कार्यक्रम सातत्याने सुरू आहेत. पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये झालेले अनेक जणांचे प्रवेश आणि उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता असतानाच शिवसेनेबरोबर युती करण्यासंदर्भात सुरू झालेली चर्चा यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अवस्थता वाढल्याचे चित्र आहे. युती झाली तर काय होणार, अशी धास्ती इतर पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नगरसेवकांना लागली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महापालिकेत सत्ता मिळविण्याची तयारी पक्षाकडून सुरू झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागनिहाय तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका आणि अन्य आनुषंगिक तयारीही पक्षाकडून सुरू होती. प्रभाग रचना भाजपला अनुकूल असल्याचे आणि शहरातील वातावरणही पक्षाला सकारात्मक असल्याचे दिसून आल्यानंतर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या माध्यमातून इतर पक्षांमधील अनेक विद्यमान नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. किंबहुना या सर्वाना पक्षात आणण्यात आले आणि पक्षात येण्याची चढाओढच नगरसेवक, कार्यकर्ते आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली. या कालावधीत काकडे यांनी शहर भाजपवर त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही पक्षप्रवेशांमुळे पक्षाला टीका सहन करावी लागली. त्या प्रवेशांमुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले गेले. पक्षप्रवेश केलेल्यांना निवडणुकीसाठीची उमेदवारी देणार का, अशी चर्चा पक्षात सुरू झाली होती. निवडणुकांच्या दृष्टीने पक्षपातळीवर कार्यक्रम सुरू असतानाच शिवसेनेबरोबर युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली.

मुळातच कार्यकर्त्यांना शिवसेनेबरोबर युती नको आहे. मात्र नेत्यांना युती हवी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून युती नको, अशी चर्चाही उघडपणे कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाल्याचे दिसून येते.भाजपची लोकप्रियता, शहरात वाढलेली ताकद, शहर विकासासंदर्भात राज्य शासनाने घेतलेले निर्णय यामुळे भाजपला निवडणुकीत सत्ता मिळविणे शक्य आहे, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे निवडणुकीत स्वबळावर लढून आवश्यकता पडल्यास मित्रपक्षांना बरोबर घ्यावे, असा मतप्रवाहही कार्यकर्त्यांमध्ये आहे. युती झाली तर भाजपची वाढती ताकद लक्षात घेऊन सेनेला कमीत-कमी जागा द्याव्यात, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे. त्यामुळेच इच्छुक उमेदवार शहर भाजपच्या निवडणूक कार्यालयाकडे धाव घेत युतीबाबत चर्चा करतानाही दिसत आहेत.

युतीबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था असतानाच पक्षात प्रवेश केलेल्या काही विद्यमान नगरसेवकांचेही राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे. भाजपकडून उमेदवारी दिली जाईल, या शब्दावरच त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे उपनगरांमधील भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न झाला. त्यातच शहर भाजपकडून सर्वानाच उमेदवारी मिळेल असे नाही. तर पक्षाच्या रचनेत जे बसतील, त्यांना उमेदवारी दिली जाईल, असे वारंवार स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हे विद्यमान नगरसेवकही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. युती नको, अशी त्यांच्यातही चर्चा आहे. पण युती झालीच तर पुढे काय करायचे, हा प्रश्नही आहे.

महापालिकेत भाजप

२००७         २५

२०१२          २६