पुणे : ज्या मातोश्रीने तुम्हाला आईच्या प्रेमाने सांभाळले तुम्हाला जवळ केले ,ज्या मीनाताईनी जेवण झाल्याशिवाय मातोश्री बाहेर पडू दिले नाही. त्यांच्याबद्दल तुम्ही विधान केले. आता या विधानाविरोधात आम्ही उद्या पासून राज्यभरात आंदोलन करणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच रामदासजी मला तुमच्यासारखे गल्लीबोळात बोलायची सवय नाही. तुमच्यात जर हिम्मत असेल आमनेसामने बोलायला आवडते अशा शब्दात रामदास कदम यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, रामदास कदम यांनी काल केलेले विधान पाहून रामदास कदम यांच्यात एवढी ताकद कधी आली. ते निष्ठेची भाषा बोलू लागले. पण मी त्यांच्या निष्ठे बद्दल काहीच बोलणार नाही. त्यावर आमच्या नेत्यांकडून भूमिका मांडण्यात आल्या आहेत. तसेच तुम्ही ज्यांच्या मांडीवर जाऊन बसला आहात. त्यांच्यापैकी एक नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितले होते की तुम्ही माझ्याकडे येणार होतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. दोन वेळा पक्षाला धमकावून दुसर्‍या पक्षात जाणार म्हणणार्‍यांनी निष्ठे बद्दल आमच्याशी बोलू नये , अशा शब्दात शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा : वीजेच्या धक्क्याने गमावले हात, पतीनेही सोडली साथ, जगण्याची जिद्द न हरलेल्या झुंजार महिलेला तुम्हीही द्याल शाबासकी

मिंदेसेनेने जास्त अक्कल पाजूळ नये

सध्या ‘मिंदेसेना’ इतरांना शिल्लक सेना म्हणत आहे. पण आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की, कफल्लक गेल्यानंतर जे इमानदार शिल्लक राहिले आहेत. अशा शिल्लक लोकांची शिल्लक सेना आहे.त्यामुळे यावर मिंदेसेनेने जास्त अक्कल पाजूळ नसल्याच सांगत शिंदेगटावर त्यांनी निशाणा साधला.

रामदास कदम तुम्ही अनुरूप विवाह संस्थेच कॉन्ट्रॅक्ट घेतल का ?

रामदास कदम सारखे म्हणतात आदित्य ठाकरे यांचे लग्न झाल नाही. आहो रामदास कदम तुम्ही अनुरूप विवाह संस्थेच कॉन्ट्रॅक्ट घेतल का ? वधू वर सूचक मंडळ काढले आहे का ? त्यामुळे आदित्य ठाकरे यांच लग्न होत आहे का नाही हा राजकारणाचा विषय होत नाही. मला त्यावर एकच म्हणायच आहे की,’ मिंदेसेना’ सध्या भाजपच्या स्क्रिप्टवर काम करीत आहे. राहुल गांधी काय प्रश्न विचारतात. त्या प्रश्नावर बोलण्याचा ऐवजी त्यांनी लग्न केल की नाही त्यावर ते बोलत राहतात.हीच पद्धत आदित्य ठाकरे विरोधात वापरली जात आहे. मिदेसेने एक लक्षात ठेवावे की, ज्या भाजपच्या मांडीवर जाऊन बसला आहात त्या पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी हे अविवाहित होते , त्यावरून टिप्पणी करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची बाजू घेत वैयक्तिक पातळीवर कोणी घसरू नये असे ठणकावून सांगितले.

हेही वाचा : विरोधक तर असला पाहिजे आणि तोही दिलदार ; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

12 आमदारांमध्ये आपला समावेश व्हावा,त्यासाठी आदळआपट

सध्या राज्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार टीका करीत आहेत.त्यामध्ये रामदास कदम हे देखील आहेत. मात्र त्याची जी धडपड किंवा आदळआपट जी चालली आहे.ती राज्यपाल नियुक्त नव्याने 12 आमदाराची यादी होणार आहे त्यामध्ये आपला समावेश व्हावा मी किती निष्ठावंत आहे.हे दाखवून देण्याचा रामदास कदम प्रयत्न करीत असल्याच सुषमा अंधारे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena deputy leader sushma andhare aggressive on statement ramdas kadam svk
Show comments