पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार प्रकरणात शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांचा जामीन शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी याबाबतचे आदेश दिले. जामीन दिल्यानंतर न्यायालयाने नमूद केलेल्या अटींचे आरोपीने उल्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपीला जामीनावर सुटण्याचा अधिकार नाही. न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाचा गैरवापर होत असून कुचिक यांचा जामीन रद्द करण्यात यावा, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. कुचिक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वाँरंट बजाविण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणीवर बलात्कार, तसेच धमकावून गर्भपात, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुचिक यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कुचिक यांना ११ मार्च २०२२ रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कुचिक यांनी न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिलेल्या अर्टी, शर्तींचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, असा अर्ज पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिला होता.

हेही वाचा >>> “राज्याचे ऑनलाईन नेतृत्व करणारे उध्दव ठाकरे आता…”; शंभूराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पिडीत तरुणीने तिचे वकील ॲड. सागर शिंदे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कुचिक यांनी न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिलेल्या अटींचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, असा युक्तीवाद ॲड. शिंदे यांनी केला. न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरुन कुचिक यांचा जामीन रद्द केला. ॲड. शिंदे यांच्यासह ॲड. सुधीर शिंदे, ॲड. विशाखा जगताप यांनी पिडीत तरुणीच्या वतीने कामकाज पाहिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader raghunath kuchik problems increase bail canceled in rape case pune print news rbk 25 ysh
Show comments