पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद येथील सभेत म्हणाले की, शिंदे गटाला बुडबुड्यांचं प्रमाण दिले गेले, पण याच बुडबुड्यांनी तुमची  धुलाई केली. या वक्तव्याचा समाचार  पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतला. “आमच्या शिवसेनेकडे कपडे धुण्यासाठी जो धोटा वापरला जातो तो आमच्याकडे असून त्यामुळे आम्ही कशाचीही चांगली पद्धतीने कोणत्याही पद्धतीचा त्रास न देता चांगल्या प्रकारे साफसफाई करू शकतो, आमच्याकडे विचारांची ताकद आहे.ती पवित्र आणि चांगली आहे ” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीका गोऱ्हे यांनी लगावला आहे.

हेही वाचा <<<Maharashtra News Live : मुख्यमंत्र्यांचं पैठणमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन, एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा <<<पुणे : गुरुवारी संपूर्ण दिवस काही भागाचा पाणीपुरवठा बंद

त्याच सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की,ही खऱ्या शिवसेनेची गर्दी असून मी एकदा शब्द दिला तर मी माझं देखील ऐकत नाही. त्यावर “नया है वह” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नीलम गोऱ्हे यांनी निशाणा साधला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना रस्त्याने फिरताना अवघड होईल, तुम्हाला देखील परवानगी घेऊन फिरावे लागेल, अशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. “नारायण राणे यांची फार मोठी हतबलता आहे.उद्धव ठाकरे यांच्यावर बोल्याशिवाय काही प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे ते सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर बोलत असतात.आम्ही त्यांना कोकणात,बांद्रा मध्ये सर्व सामान्य कुटुंबातील महिलेने पराभव केला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी जर आपण पहिल्या तर त्यामुळे कोणाला कुठून पळावा लागते.हे त्याबाबतचा विचार त्यांनी करायला पाहिजे. मुंबईतील गोळीबार प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे, अशा वेळेला सारख्याला वारका गुरू (सदा सरवणकर) मिळाला” अशा शब्दात नारायण राणे यांना नीलम गोऱ्हे यांनी टोला लगावला.

Story img Loader