मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिरूर येथील शिवसंकल्प सभेत जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मानापमान नाट्य रंगले. जिल्हाप्रमुखांना व्यासपीठावर जागा न देता शिरूरचे  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थक पदाधिका-यांना व्यासपीठावर स्थान दिल्याने पदाधिका-यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानची सुरूवात शिरूर लोकसभा मतदारसंघापासून शनिवारी झाली. मात्र पदाधिका-यांतील मानापमान नाट्य अभियानात रंगले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, ‘धाडस केले नसते तर शिवसेना…’

जिल्हा प्रमुख रमेश कोंडे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले तर दुसरे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांना व्यासपीठा खाली बसविल्याने ते नाराज झाल्याची चर्चा पदाधिका-यांमध्ये सुरू झाली. तुपे यांनीही त्याबाबत पक्षाच्या काही नेत्यांकडे जाहीर नाराजी व्यक्त केली असून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या ढिसाळ नियोजनाबाबात तक्रार नोंदविली आहे. पक्ष वाढवायचा असेल तर सर्वांनी मिळून काम करावे लागते. खुनशी राजकारण करून पक्ष वाढत नाही. जिल्ह्याबरोबर शहरातील पदाधिकारीही नाराज झाले आहेत.पक्षाला काम करणा-या पदाधिकारी कार्यकर्ते यांची गरज राहिलेली नाही, अशा शब्दात तुपे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे काही पदाधिका-यांनी सांगितले. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर तुपे यांनी निशाणा साधल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.