पिंपरी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून भाजपचे नेतेच बोलत आहेत. भाजपने राज्यपालांना दिल्लीत परत बोलावून घ्यावे आणि भाजपच्या प्रवक्ते पदावर नेमणूक करावी, अशी मागणी शिवसेनेचे पिंपरी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा अवमान करणारे वक्तव्य केला असून शिवसेनेने राज्यपालांच्या निषेधार्थ पिंपरी चौकात आंदोलन केले. निलेश मुटके, शैलजा खंडागळे, ॲड. उर्मिला काळभोर, भाविक देशमुख, अनंत कोऱ्हाळे, तुषार नवले, युवराज कोकाटे आदींनी सहभाग घेतला.

शहरप्रमुख भोसले म्हणाले, की राज्यपालांच्या मनात महाराष्ट्रबाबत असलेली खदखद ते सातत्याने व्यक्त करीत आहेत. त्यांच्या तोंडी भाजपचीच भाषा आहे. ॲड. काळभोर म्हणाल्या, की राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा अपमान केला आहे. राज्यपालांनी पालक म्हणून काम करावे, परंतु ते भाजपाचे प्रवक्ते पदाधिकारी असल्यासारखे बोलतात. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचे महत्त्व कमी केले आहे. या पदावर कसे वागावे याचे त्यांना ज्ञान नाही. महाराष्ट्राचा इतिहास त्यांना माहित नाही, असेही ॲड. काळभोर म्हणाल्या.

Story img Loader