पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा येत्या तीन ऑगस्ट रोजी होणार आहे. या निमित्ताने या पक्षाकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी आणि इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पक्षपातळीवर बैठका, संघटनात्मक बांधणीबरोबरच मेळावे सुरू झाले असतानाच शिवसेनेकडूनही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीसाठी कसबा, हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. यातील हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर कसबा विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेची ताकत आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात या तिन्ही मतदारसंघांतील इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>मुंबईसह किनारपट्टी, पश्चिम घाटपरिसरात तीन दिवस पावसाचा जोर

उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच खासदार, प्रवक्ते संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि आमदार भास्कर जाधव गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा मेळावा होण्याची शक्यता आहे. या मेळाव्याच्या दृष्टीने शहर पातळीवर नियोजनही सुरू करण्यात आले आहे. सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली येत्या दोन ते तीन दिवसांत बैठक होणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यात भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला होता. भाजपच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. ‘औरंगजेब फॅन क्लब’चे ठाकरे हे अध्यक्ष आहेत, अशी कडवट टीका शहा यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे पुण्यातील मेळाव्यात या टीकेला काय उत्तर देतात, याबाबत उत्सुकता असणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray faction to meet in pune on august 3 pune print news apk 13 amy
Show comments