पुणे : शिवाजीनगर मतदारसंघात आजवर दुरंगी लढत होत असल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस ही पारंपरिक लढत कायम राहिली आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपचे विद्यामान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात काँग्रेसने दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी बंड पुकारले असून, या मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ राबविला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार आहे.

भाजपने विद्यामान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केली, तरी काँग्रेसने उमेदवार निश्चित करण्यास विलंब लावला. गेल्या निवडणुकीत दत्ता बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली होती. या वेळी मनीष आनंद हेदेखील इच्छुक होते. दोन्ही इच्छुक तुल्यबळ असल्याने काँग्रेसपुढे कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न होता. शेवटच्या क्षणी बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मनीष आनंद नाराज झाले. उमेदवारीपासून डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
Loksatta anvyarth Confusion in Assembly session after Jammu and Kashmir became Union Territory
अन्वयार्थ: काश्मिरी राजकारणाचा बदलता ‘दर्जा’
Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi for spreading chaos in India print politics news
‘भारत जोडो’तून अराजक पसरवण्याचे काम; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका
Loksatta chavadi political drama in maharashtra
चावडी: बंटी पाटील एवढे का संतापले?

हेही वाचा >>>पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान

या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी मनीष आनंद यांनी अनेक महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. त्या दृष्टीने त्यांनी जनसंपर्क वाढविला होता. त्यांची पत्नी पूजा आनंद यांच्याकडे काँग्रेसचे महिला शहराध्यक्ष पद असल्याने त्यांनीही महिला मतदारांच्या संपर्कावर भर दिला होता. मात्र, काँग्रेसने पुन्हा बहिरट यांना उमेदवारी दिल्याने मनीष आनंद यांनी बंडखोरी केली. मनीष आनंद यांच्या सर्वपक्षीय संबंधांमुळे बहिरट यांची कोंडी झाली आहे, तर विद्यामान आमदार शिरोळे यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन मनीष आनंद यांची साथ दिल्याने या मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ राबविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बहिरट हे २०१२ मध्ये महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये ते पराभूत झाले. मनीष आनंद हे २००८ मध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीत मनीष आणि त्यांच्या पत्नी पूजा हे दोघेही निवडून आले होते. त्यांचे या भागात प्राबल्य आहे. शिरोळे हे नगरसेवक हाते. त्यानंतर मागील निवडणुकीत ते आमदार झाले.

हेही वाचा >>>“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

आतापर्यंत या मतदारसंघात दुरंगी लढत होत होती. पुणे महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे हे १९६२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढून मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. त्यानंतर १९७८ पासून या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आली आहे. दिवंगत खासदार अण्णा जोशी हे १९८० आणि १९८५ मध्ये निवडून आले होते. १९९० मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी १९९० आणि १९९५ मध्ये सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९९ च्या निवडणुकीत सुतार यांच्याऐवजी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली. १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. तोपर्यंत कोथरूडचा परिसर या मतदारसंघात होता. २००९ मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कोथरूड हा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्या वेळी निम्हण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसकडून निवडणूक लढविली आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र निम्हण यांचा भाजपचे माजी आमदार विजय काळे यांनी पराभव केला. मागील निवडणुकीत काळे यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. यंदा पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. मनीष आनंद यांच्या उमेदवारीमुळे लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.