शिरुर: तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने शहरातील ८ महिलांचा शिवदुर्गा सन्मान पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.जुन्या नगरपरिषद कार्यालया जवळ शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा शिवसेनेच्या संपर्क प्रमुख गीतांजली ढोमे , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार,मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे,शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात ,तालुका संघटक सुरेश गाडेक ,महिला आघाडीच्या सुजाता पाटील,अध्यात्मिक आघाडीचे प्रमोद महाराज जोशी ,भरत जोशी आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात हॉटेल व्यवसायिका सुलोचना रामदास गिरमकर,वात्सल्यसिंधू फाउंडैशनच्या उषाताई शैलैश वाखारे ,आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे ,जिम चालक व हॉटेल व्यवसायिका प्रिया बिरादार ,ऑक्टिव्ह सोशल गृपच्या कामिनी बाफना ,ॲड.सोनाली अच्छा,पोलीस कॉन्स्टेंबल प्रतिभा देशमुख ,डॉ.किर्ती मदने या महिलांचा सन्मान शिवदुर्गा पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला .

गीतांजली ढोमे  यावेळी म्हणाल्या की  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणूकीनुसार जीवन आचरावे.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त  शिरुर परिसरातील महिलांचा  शिवदुर्गा पुरस्कार देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.शिरुर शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत पाठ पुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी केले .

माजी नगरसेवक विनोद भालेराव  म्हणाले की  शिवजयंती निमित्त विचाराचा जागर करावा .ॲड. सुभाष पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावची शिकवण दिली .नामदेवराव घावटे यांचे ही भाषण झाले .स्वागत व प्रस्ताविक शहरप्रमुख मयूर थोरात यांनी केले.सुरेश गाडेकर यांनी आभार मानले .

ढोल ताश्याचा गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना( उध्द्वव बाळासाहेब ठाकरे ) च्या वतीने पुणे नगर रस्त्यावरील पंचायत भवन जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .यावेळी   शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख ,माजी उपसभापती पांडृरंग थोरात, माजी सभापती प्रभूलिंग वळसंगे  मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , माजी नगरसेवक मंगेश खांडरे  ,कॉग्रेस आयचे संतोष गव्हाणे ,माजी शहरप्रमुख कैलास भोसल ,तालुका संघटक शकिल खान ,ज्येष्ठ शिवसैनिक खूशाल गाडे, सुनील चौधरी  ,राजेंद्र शिंदे  , उप शहर प्रमुख महादेव कडाळे ,उपशहरप्रमुख  संतोष पवार ,भरत गाडेकर , माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे , आदी उपस्थित होते .

याप्रसंगी हिंगणी येथील वीर योध्दा एकलव्य ढोल ताथा पथक यांच्या ढोल ताथा वादनाने परिसर दणाणून गेला .संदेश केंजळे म्हणाले की शिवजयंतीनिमित्त निबंध स्पर्धा,क्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे .छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते व लोककल्याणकरी राज्य कारभार त्यांनी केले .

शहरप्रमुख संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले.त्यात त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी  समाजातील सर्वाना बरोबर घेवून स्वराज्याची निर्मिती केली.ॲड .सुभाष पवार म्हणाले की  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे अनुकरण करावे .यावेळी नामदेवराव घावट ,प्रभूलिंग वळसंगे , पोपटराव शेलार यांची भाषणे झाले .आभार प्रकाश बाफना यांनी मानले .

Story img Loader