आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ओळख ‘धर्मवीर’ म्हणूनच केली गेली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा होऊ नये, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर रविवारी निशाणा साधला.

हेही वाचा – पुण्यातील ‘पुण्यश्वर मंदिराच्या जागी भव्य महादेवाच मंदिर उभारावं’: तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर यांची मागणी

हेही वाचा – पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच, अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

पुण्यामध्ये काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भूमिका स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू समाजातही भीतीचे वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. शिवाय मोदीही आहेत. राज्यात देखील भाजपचे सरकार आहे. त्यामुळे मोर्चाची दखल घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्थापनेवेळी धर्माचे रक्षण करावे, हा देखील मुद्दा होता. या मोर्चातून आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही. आम्ही फक्त आमचा धर्म जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही भोसले यांनी सांगितले.

Story img Loader