पुणे : आज मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारलेला नाही. आजही मध्य प्रदेशातील जनता मला मामाच म्हणते. राजकारण केवळ पदासाठी नसते. मी राजकारणातून बाहेर पडलेलो नाही. अजून बरीच कामे बाकी आहेत, अशी ठाम भूमिका शिवराजसिंह चौहान यांनी मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआयटी विश्वशांती विद्यापीठात आयोजित भारतीय छात्र संसद समारोप कार्यक्रमात चौहान बोलत होते. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड या वेळी उपस्थित होते.

दहावीत असताना केलेल़्या पहिल्या आंदोलनापासूनच्या आठवणी सांगून शिवराजसिंह चौहान म्हणाले, की मध्य प्रदेशात १००० मुलांमागे ९१२ मुली इतके कमी प्रमाण होते. मुलगी म्हणजे कुटुंबावरील भार असे मानले जायचे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही मुलींचे विवाह करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री झाल्यावर पहिली योजना लाडली लक्ष्मी योजना सुरू केली. मुलगी कुटुंबाला पैसे मिळवून देणारी ठरली. त्यामुळे मध्य प्रदेशात मुलींची संख्या वाढली. आज एक हजार मुलांमागे ९७६ मुली आहेत. मुलींनीच मला मामा म्हणायला सुरुवात केली. मला माझे आयुष्य सफल झाल्यासारखे वाटते. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण दिले. १३ टक्के पदे महिलांसाठी पोलिसांमध्ये राखीव ठेवण्यात आली आहेत. लाडली बेहना योजनेची देशात चर्चा आहे. ही योजना म्हणजे रेवडी नाही. जनतेसाठी कल्याणकारी योजना आहे.

हेही वाचा : “राजकारण चोरी करणाऱ्यांसाठी आहे का?”; माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा तरुणांना सवाल

अलीकडेच झालेल्या निवडणुकीवेळी राजकीय विश्लेषक म्हणत होते, भाजप निवडून येणार नाही. पण मी जिंका़यंचच ठरवलं होतं. मात्र या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवला, तसंच आतापर्यंतची सर्वांत जास्त मतेही भाजपला मिळाली. २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आता रामलल्ला येतील आणि रामराज्यही येणार आहे, असेही शिवराजसिंह चौहान म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivraj singh chauhan comment on his political future in pune print news ccp 14 pbs