लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मामा या नावानेही ओळखले जातात. पुण्यात भारतीय छात्र संसदेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवराजसिंह चौहान यांनी मामा होण्याची गोष्ट सांगितली.

शिवराजसिंह चौहान म्हणाले, की मध्य प्रदेशात एक हजार मुलांमागे मुलांमागे ९१२ मुली इतके कमी प्रमाण होते. मुलगी म्हणजे कुटुंबावरील भार असे मानले जायचे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही मुलींचे विवाह करून देण्यास सुरुवात केली. तसेच मुख्यमंत्री झाल्यावर पहिली योजना आणली लाडली लक्ष्मी… या योजनेतून मुलींना वेगवेगळ्या टप्प्यावर पैसे देण्यात येऊ लागले. त्यामुळे मुलगीच कुटुंबाला पैसे मिळवून देणारी ठरली. गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेशातील मुलींचे प्रमाण वाढले आहे. आज एक हजार मुलांमागे ९७६ मुली आहेत. मुलींसाठी उपयुक्त योजना सुरू केल्यामुळे मुलींनीच मला मामा म्हणायला सुरुवात केली. आईचा भाऊ म्हणजे मामा, मुलांवर आईसारखं प्रेम करतो तो मामा असतो. त्यामुळे मला माझे आयुष्य सफल झाल्यासारखे वाटते. लाडली बेहना योजनेची देशात चर्चा आहे. ही योजना म्हणजे रेवडी नाही. जनतेसाठी कल्याणकारी योजना आहे.

आणखी वाचा-“राजकारण चोरी करणाऱ्यांसाठी आहे का?”; माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा तरुणांना सवाल

स्त्रियांना सन्मान मिळवून देणे, त्यांच्या पुरुषांच्या बरोबरीला आणणे हा माझ्या आयुष्याचा संकल्प असल्याचेही शिवराजसिंह चौहान यांनी आवर्जून नमूद केले. आता मुख्यमंत्री नसलो, तरी मध्य प्रदेशातील जनता मला प्रेमाने मामा म्हणते. त्यामुळे अनेक बाकी असलेली कामे करत राहणार आहे. त्यात महिला, गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षण, पर्यावरण अशा विषयांवर काम करायचे असल्याचे चौहान यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivraj singh chauhan open up about why people call him mama pune print news ccp 14 mrj