लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ज्या पध्दतीने मतांचा पाऊस पाडला, त्याचप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकीचे चित्र असले पाहिजे. िपपरीत शिवसेनेचा महापौर हीच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा ठरेल, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शाखेने विविध उपक्रमांचे आयोजन केले, त्यातील भोसरीच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, पालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख गजानन चिंचवडे, योगेश बाबर, धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले,‘गेल्या काही दिवसांपासून शहर शिवसेनेचे काम चांगले चालले आहे. मात्र, सेनेच्या दोन खासदारांमध्ये मतभेद आहेत, हा प्रसार माध्यमांचा शब्दछल आहे, प्रत्यक्षात तसे काही नाही. मावळ, शिरूर लोकसभा तसेच िपपरी विधानसभेत ज्या पध्दतीने मतांचा पाऊस पडला, त्याचपध्दतीने महापालिका निवडणुकीत व्हायला हवे. शिवसेनेचा महापौर होण्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील ‘मी’ पणा सोडून संघटना म्हणून एकत्र आले पाहिजे. बारणे व आढळराव यांनी आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचे या वेळी बोलताना स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा